‘भारतात आणखी एक हल्ला झाल्यास पाकला गंभीर परिणाम भोगावे लागतील’

नवी दिल्ली – भारतात आणखी एखादा दहशतवादी हल्ला झाल्यास पाकिस्तानला गंभीर परिणाम गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशा शब्दात अमेरिकेने पुन्हा एकदा पाकिस्तानला चेतावणी दिली आहे.  पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर कडक कारवाई करावी. विशेषतः जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोय्यबासारख्या संघटनांवर कारवाई करण्यास अमेरिकेने पाकिस्तानला सांगितले आहे.

वॉशिंग्टनस्थित व्हाईट हाऊसमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले कि, भारत-पाकिस्तानमध्ये कोणताही तणाव निर्माण होऊ नये यासाठी पाकिस्तानने दहशतवादी संघटनांवर कडक कारवाई करण्याची गरज आहे. विशेषतः जैश-ए-मोहम्मद आणि लष्कर-ए-तोय्यबासारख्या संघटनांविरोधात पाकिस्तानने कठोर पावले उचलावीत. जर परिस्थिती बिघडली तर दोन्ही देशांसाठी नुकसानदायी असू शकते, असेही त्यांनी म्हंटले. ते पुढे म्हणाले कि, पाकिस्तानने गेल्या काही दिवसांमध्ये दहशतवादी संघटनांविरोधात भूमिका घेतली आहे. मात्र, त्यांनी आणखी कठोर भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. पाकिस्तानने यापूर्वीही दहशतवादी संघटनेच्या म्होरक्यांना नजरकैदेत ठेवले आणि काही महिन्यांनी त्यांची सुटका केली. काही नेत्यांना तर देशभरात फिरण्याची आणि जाहीर सभा घेण्याचीही मुभा आहे. त्यामुळे पाकिस्तानने आता ठोस आणि कठोर भूमिका घ्यावी, असे व्हाइट हाऊसमधील अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

दरम्यान, पुलावाममध्ये १४ फेब्रुवारी रोजी सीआरपीएफच्या जवानांवर दहशतवादी हल्ला झाला होता. यामध्ये ४० जवान शहीद झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने घेतली होती. यानंतर भारताने पाकमध्ये घुसून दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.

×