संग्रामसारखा सुपूत्र असता तर विरोधीपक्षनेते अडचणीत नसते – धनंजय मुंडे

नगर: विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी मोदीसह भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्यावर जोरदार टिका करून संग्रामसारखा सुपूत्र असता तर विरोधी पक्षनेते आज अडचणीत आले नसते असा टोला लगावला. लोकसभा निवडणुकीसाठी कॉंग्रेस आघाडीचे नगर दक्षिणचे उमेदवार आमदार संग्राम जगताप व शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार संग्राम जगताप यांनी जोरदार शक्‍तीप्रदर्शन करीत आज उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान आयोजित सभेत धनंजय मुंडे बोलत होते.

मुुंडे म्हणाले, महाराष्ट्रात येऊन शरद पवार यांच्या घरावर वाच्यता करण्यापेक्षा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वप्रपंचाची जबाबदारी घ्यावी. मागच्या वेळी यांनी 15 लाखाचा जुमला फेकला, आता 20 लाखांचाही फेकतील. यांचा काही नेम नाही. भाजपचा स्थापना दिन आणि मोदी दिन (फेकू दिन) एक एप्रिललाच साजरा करावा असा सल्ला देत त्यांनी, तुमच्या वर्तणुकीला अगदी साजेसा दिवस आहे, अशी उपहासात्मक टीका केली.

सुपूत्र कसा असावा याचे उत्तम उदाहरण म्हणजे लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप. संग्राम आईवडिलांची आज्ञा तर पाळतातच मात्र ते इथल्या जनतेचेही आज्ञाधारक आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सभागृहात आंदोलन करून निलंबित होणाऱ्यांच्या यादीत त्यांचे नाव होते. हाच लोकांप्रती खरा कळवळा असलेला युवक आहे. सुपूत्र आणि कुपूत्र यांतील फरक आज नगरवासियांच्या समोर आहे. इथल्या भाजप उमेदवाराचे नाव “कुजय’ असायला हवं होतं अशी खोचक टीका ना. मुंडे यांनी केली.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.