सततच्या लॉकडाऊनने वाढले मुलांचे वजन तर ‘ही’ बातमी वाचाच

योगाचे अनेक फायदे आहेत. लहान वयात योगा करायला सुरुवात केली की त्याचे अनेक फायदे भविष्यात होताना दिसतात. योगासने करणे हे केवळ शारीरिक नाही तर मानसिकृदष्ट्याही फायदेशीर ठरते.

उलटपक्षी योगा करणं हे योग्य वयात, म्हणजे लहानपणापासून करणं गरजेचं आहे. त्यामुळे तुमच्या मुलांना देखील योगाचे धडे द्यायला सुरुवात करायला काहीही हरकत नाही. उलट जितक्‍या लवकर शक्‍य होईल, तितक्‍या लवकर त्यांना योगाचे धडे देणे सुरू करा. लहान मुलांनी योगा करण्याचं योग्य वय म्हणजे तीन वर्ष. तीन वर्ष आणि त्यापुढील लहान मुलांनी योगा करण्यास सुरूवात करावी. लहान वयात योगा करायला सुरुवात केली की त्याचे अनेक फायदे भविष्यात होताना दिसतात. केवळ शारीरिक नाही तर मानसिकृदष्ट्याही योगा फायदेशीर ठरतो.

लहान वयात मुलांना योगा शिकवणं किंवा योग्य प्रकारे, योग्य पद्धतीने त्याचं प्रशिक्षण देणं फार गरजेचं आहे. सुरुवातील मुलांना सोपी आसनं करायला सांगा. जसं की, आवाज सुधारण्यासाठी कऱण्यात येणारी आसनं किंवा बटरफ्लाय पद्धत. यामुळे मुलांच्या पायातील ताकद वाढण्यास मदत होईल. यासोबतच मुलांना कसा योगामध्ये योग्य प्रकारे श्‍वास घ्यायचा. प्रत्येक आसनावेळी कसा श्‍वास घ्यायचा याची नीट माहिती द्या. योगासनं करताना मुलांना बसण्याची योग्य पद्धत सांगावी. यामुळे त्यांचं शरीर रिलॅक्‍स होऊन स्नायूंना आराम मिळतो. मुलांना नवीन आसनं वेगळ्या आणि गमतीदार पद्धतीने शिकवा. योगा शिकताना मुलांनाही आनंद वाटला पाहिजे.

मुलांना जितकं जमत असेल तितकचं करायला सांगा. लहान मुलांसाठी योगासनं शिकवताना प्रथम लहान मुलांना अल्फाबेट्‌स म्हणायला सांगावेत. असे केल्यामुळे त्यांच्या जीभेचा एक प्रकारे व्यायाम होई. याशिवाय न अडखळता बोलणं आणि स्वरासंबंधी माहिती मिळणे हे फायदेशीर ठरेल दिवसातून एकदा तरी मुलांना हे करायला सांगा.

योगा केल्याने मुलांच्या बसण्याची पद्धत सुधारते.
योगा केल्याने मुलांची एकाग्रता वाढण्यास मदत होते. शिवाय एखाद्या गोष्टीवर पूर्ण लक्ष केंद्रित करणंही सोपं जातं.
मेडिटेशन आणि दीर्घ श्‍वास यामुळे ताण कमी होण्यास मदत होते. यामुळे लहान मुलांचा एखाद्या गोष्टीतील स्टॅमिना वाढतो.
मुलांचा आत्मविश्‍वास वाढतो.
आताचे युग हे स्पर्धेचे युग आहे. ही स्पर्धा अतिशय लहान वयापासून सुरू होते व ती कधी संपतच नाही. या स्पर्धेत जो जिंकतो तो यशस्वी होतो व जो हरतो तो अपयशी होतो. जो हया स्पर्धेत तग धरू शकतो तो आत्मविश्‍वास मिळवतो व स्वत:ची प्रगती करून घेतो, व जो तग धरू शकत नाही तो हरतो, आत्मविश्‍वासगमवून बसतो. हयातून नैराश्‍य निर्माण हाते. जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन नकारात्मक होत जातो. अभ्यासाची नावड उत्पन्न होते. सारासार विचार करण्याची प्रवत्ती नष्ट होते. हया गोष्टीतूनच विघातक गोष्टी करण्याची मुलांची प्रवृत्ती होते.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.