‘आरक्षण रद्द झाले असेल तर आता सरकारकडे पर्याय काय’; विनोद पाटील यांचा सवाल

नवी दिल्ली – राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या अतिशय संवेदनशील मुद्दा म्हणजेच मराठा आरक्षणावर आज (दि. ५) सुप्रीम कोर्टाने महत्वाचा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने मराठा आरक्षण रद्द केलं आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या मुद्द्याभोवती राजकारण फिरत होत.

दरम्यान, न्यायालयाचा निकाल येताच मराठा आरक्षण लढ्यातील याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले… ” मागच्या वर्षी न्यायालयाने स्पष्ट केले होते, स्थगितीचा संबंध नाही. अंतिम निकाल देऊ. याचवेळी प्रकरण वर्ग करणे गरजेचे होते. सरकारची आरक्षण देण्याची इच्छा नव्हती, असे मी म्हणणार नाही.

पण सरकार कडे काही युक्ती देखील नव्हती. आरक्षण रद्द झाले असेल तर आता सरकारकडे काय पर्याय आहे, हे त्यांनी स्पष्ट केले पाहिजे. निवड झालेले विद्यार्थी, शिक्षण प्रवेशाचा प्रश्न आहे. सरकारने विशेषबाब म्हणून विचार करावा. आम्ही संयमानेच हे प्रकरण हाताळू, असं विनोद पाटील म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.