निवडणूक आयोग भेदभाव करत असेल तर ..- मायावतींची खोचक टीका

नवी दिल्ली – बसपा प्रमुख मायावती यांनी आज ट्विटरद्वारे निवडणूक आयोगावर निशाणा साधताना, “मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ प्रचारबंदीचे उल्लघंन करत असताना देखील त्यांच्यावर कारवाई का केली जात नाही?” असा प्रश्न उपस्थित केला आहे. तत्पूर्वी निवडणूक आयोगाने  जातीयवादी विखारी प्रचार करून प्रचाराचे वातावरण कलुषित केल्याबद्दल उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यावर प्रचारबंदी लागू केली होती. मायावती यांनी प्रचारबंदीची कारवाई संपल्यानंतर थेट निवडणूक आयोगावरच प्रश्न उपस्थित केले आहेत.

मायावती यांनी ट्विटद्वारे निवडणूक आयोगाला प्रश्न विचारत, ”निवडणूक आयोगाच्या प्रचारबंदीचे उल्लंघन करत मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ शहरात, मंदिरांत आणि दलितांच्या घराबाहेर जाऊन जेवण करण्याचे नाटक करत आहेत. त्याचे प्रसारण मीडियामध्ये करुन निवडणूकीत लाभ घेण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांच्यावर आयोग दया का दाखवत आहे? जर असा भेदभाव भाजपा आणि इतर नेत्यांच्या बाबतीत निवडणूक आयोग करत असेल तर ही निवडणूक स्वतंत्र आणि निष्पक्ष होण्याची शक्यता कमी आहे.” असा संदेश त्यांनी लिहिला आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.