मुंबई: आम्ही एनडीएचे घटक पक्ष असलो तरी कमळावर विधानसभा लढण्यास तयार नाही. आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या चिन्हावरच लढणार असल्याचे रासप अध्यक्ष आणि मंत्री महादेव जानकार यांनी स्पष्ट केले.
नुकत्याच लोकसभा निवडणुकीमध्ये भाजपने मुसंडी मारली आणि पुन्हा एकदा केंद्रात भाजपचे सरकार स्थापण केले. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी जोरदार मोर्चेबांधणी सुरु केली आहे.
२०१४ लोकसभा निवडणुकीत राष्ट्रीय समाज पक्षाचे महादेव जानकर यांनी भाजपच्या साथीनं सुप्रिया सुळे यांना चांगलीच टक्कर दिली होती. मात्र महादेव जानकरांना भाजपचं कमळ चिन्ह देण्यात आल नव्हतं, तेव्हा त्यांनी ‘कपबशी’ या चिन्हावर निवडणूक लढविली होती. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुका राष्ट्रीय समाज पक्ष स्वतःच्या चिन्हावरच लढणार असल्याचे, जाणकार म्हणाले.