‘कुंभमेळा आटोपता घेण्याची विनंती दुसरी कुणी केली असती, तर हिंदूद्रोही ठरवले असते’

काँग्रेस नेत्याची टीका

नवी दिल्ली : देशभरात करोनाचा हाहाकार सुरु असून कुंभमेळ्यातही त्याचा शिरकाव झाला आहे. कुंभमेळ्यामुळे आगामी काळात देशातील परिस्थिती बिघडू शकते, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. अशातच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा आटोपण्याची विनंती केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी भाजपवर निशाणा साधला आहे. 

संजय निरुपम म्हणाले कि, बरे झाले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुंभमेळा समाप्त करण्याचे आवाहन केले. दुसरे कुणी केले असते, तर त्याला हिंदूद्रोही ठरवले  असते, अशी अप्रत्यक्ष टीका त्यांनी केली आहे.

कालपर्यंत ४९ लाख लोकांनी स्नान केले आहे. कोलकातापर्यंत जाणारी गंगा किती करोना कुठपर्यंत घेऊन जाईल, माहिती नाही, असे म्हणत ‘कुंभमेळा तत्काळ समाप्त करायला हवा’ असे आवाहनदेखील निरुमप यांनी स्वामी अवधेशानंद गिरी यांना केले  आहे.

दरम्यान, कुंभमेळ्यासाठी हरिद्वार येथे असंख्य साधू आणि भाविक जमले आहेत. त्यातील साधुच करोनाग्रस्त झाल्याचे आढळून आल्याने चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. कुंभमेळ्याच्या ठिकाणी कोणतेच करोना विषयक निर्बंध लागू नाहीत. असे निर्बंध लागू केले तर उपस्थितांमध्ये असंतोष पसरेल असे कारण देत सरकारने तेथे हे निर्बंध लागू करण्यास असमर्थता दर्शवली होती. याचा परिणाम असा झाला आहे की हरिद्वार मध्ये सुमारे 20 हजाराहून अधिक लोक करोनाग्रस्त झाले असल्याचे आढळून आले आहे. जुना निरंजनी आखाडा आणि आव्हान आखाड्याचे अनेक साधु करोनाग्रस्त झाल्याचे आढळून आल्याने या एकूणच प्रकाराचे गांभीर्य वाढले आहे. येथे मोठ्या प्रमाणात आलेले भाविक आता झपाट्याने आपआपल्या गावी परतु लागल्याचेही दृष्य येथे पहायला मिळत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.