मुंबई : आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचा ८० वा वाढदिवस आहे. यानिमित्ताने शिवसेनेने शरद पवार यांच्या कामांचा आणि स्वभावाचा उल्लेख करत स्तुतीसुमने उधळली आहेत. 80 वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही असा त्यांचा उत्साह आजही दिसतोय.
पवारांची हत्तीची चाल व वजिराचा रुबाब उत्तरेच्या ‘जी हुजुरी’ नेत्यांना अडचणीचा ठरला असता. त्यातून पवार बेभरवशाचे नेते असल्याची हाकाटी कायम सुरू ठेवली गेली . शरद पवार यांच्या ८० वाढदिवसाचं औचित्य साधून शिवसेनेनं सामनाच्या संपादकीयमधून त्यांची स्तुती केली आहे. यावर आता भाजप नेते अतुल भातखळकर यांनी शिवसेनेला टोला लगावला आहे.
काय म्हणाले अतुल भातखळकर
‘हो तर, पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि कधी कुठे भूकंप येईल याची काय शाश्वती? दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची भीती वाटते: शिवसेना ‘
हो तर, पवार कधी शिवसेनेला तंगड वर करायला सांगतील आणि कधी कुठे भूकंप येईल याची काय शाश्वती?
दिल्लीला पवारांच्या कर्तृत्वाची भीती वाटते: शिवसेना – https://t.co/wfwnyRQua9
via @mataonline: https://t.co/2vRlVYW2vH— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 12, 2020