पठाण मधून शाहरुख खान कमबॅक करतो आहे. शाहरुखच्या या सिनेमांमध्ये त्याच्याबरोबर सलमानदेखील छोट्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे या दोघांचेही फॅन “पठाण’ची अगदी आतुरतेने वाट बघत आहेत. “पठाण’ मधल्या छोट्या भूमिकेसाठी सलमानला मोठे मानधन देऊ केले गेले होते.
मात्र, सलमानने या रोलसाठी कोणतेही मानधन स्वीकारण्यास नकार दिला. निर्माता आदित्य चोप्राने सलमानला पुनःपुन्हा पैशाबाबत विचारले. पण सलमान आपल्या भूमिकेवर ठाम आहे. आतापर्यंत सलमानने थोडे शूटिंग केले आहे.
शाहरुख आपल्याला भावासारखा असल्याने त्याच्या सिनेमातल्या रोलसाठी आपण कोणतेही पैसे न घेता काम करायला तयार असल्याचे, त्याने स्पष्ट केले आहे. दरम्यान, करोना साथीमुळे “पठाण’ आणि “टायगर…’ या दोन्ही पिक्चरचे शूटिंग थांबवले गेले आहे.