माढामधून शरद पवार उमेदवार असते तर भाजपकडून मीच निवडणूक आखाड्यात – सुभाष देशमुख

सहकारमंत्र्यांनी आज भरला पूरक अर्ज ; पवारही भरणार पूरक अर्ज ?

सोलापूर,(प्रतिनिधी)  – आपण स्वतःहून लोकसभा निवडणुकीसाठी कोणत्याही मतदारसंघातून इच्छा व्यक्त केली नाही. मात्र माढा लोकसभा मतदारसंघातून मला उमेदवारी मिळणार होती. परंतू राष्ट्रवादीकडून शरद पवार उमेदवार असते तर माझी उमेदवारी पक्की होती, असा खुलासा राज्याचे सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी केला. माढा लोकसभा मतदारसंघातून रणजितसिंह निंबाळकर यांना पूरक म्हणून देशमुखांनी अर्ज दाखल केला, त्यामुळे वेगळ्याच चर्चेला उधाण आले आहे.

भाजपच्या हायटेक प्रचाराचा सुभाष देशमुखांच्या हस्ते प्रारंभ
सोलापूर व माढा लोकसभा क्षेत्रात भाजप, शिवसेना, रासप, रिपाई, शिवसंग्राम संघटना महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी हायटेक प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे. त्यासाठी केंद्र व राज्यशासनाच्या कल्याणकारी योजना सामान्य जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी होणाऱ्या चित्ररथाचा शुभारंभ सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते आज करण्यात आला. सोमवारी सहकार मंत्र्यांच्या कार्यालयासमोर 4 चित्र रथाचे पूजन करून शुभारंभ करण्यात आला. या चित्ररथातुन स्क्रिनवर शासनाच्या कामगिरीचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघातून माझी उमेदवारी जनतेने ठरविली होती. पक्षनेतृत्वानेदेखील विचार केला होता. शरद पवारांच्या विरोधात सुभाष देशमुख योग्य उमेदवार आहेत. मात्र शरद पवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली त्यामुळे माझ्या उमेदवारीचा विषय इथेच संपला आहे. मी माघार घेतली नाही. जर शरद पवार या मतदारसंघातून निवडणूक लढविणार असतील, तर त्यांच्या विरोधातला उमेदवार मीच असेल. असा दावा देशमुख यांनी केला. मी कुठे कधीही लढायला तयार असतो असेही ते म्हणाले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.