#CWC19 : पाऊस आला तर भारत अंतिम फेरीत

मॅंचेस्टर – विश्‍वचषक स्पर्धेतील उपांत्य लढतीवर पावसाचे सावट निर्माण झाले आहे. पावसाचा व्यत्यय भारताच्याच पथ्यावर पडणार आहे. येथील हवामान खात्याने आज व उद्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे.

आज पावसामुळे खेळ झाला नाही तर बुधवारचा दिवस त्यासाठी राखीव ठेवण्यात आला आहे. बुधवारीही खेळ झाला नाही तर भारत व न्यूझीलंड यांनी साखळी गटात केलेल्या कामगिरीचा निकष लावला जाईल. या गटात भारताने 15 गुण घेत आघाडीस्थान घेतले आहे. न्यूझीलंड 11 गुणांसह चौथ्यास्थानावर आहे. साहजिकचे गुणांच्या आधारे भारतास अंतिम फेरीत थेट प्रवेश मिळेल.

Leave A Reply

Your email address will not be published.