मुंबई – उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत सुरेखा पुणेकर लवकरच राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. त्यांच्या पक्षप्रवेशाची राज्यात जोरदार चर्चा आहे.
यावरून भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी तीन दिवसांपूर्वी ‘गरिबांकडे बघण्यासाठी राष्ट्रवादीला वेळ नाही. राष्ट्रवादी हा रंगलेल्या गालांचा मुका घेणारा पक्ष आहे,’ असा टोला लागवला होता. त्यांचा या टीकेवर आता सुरेखा पुणेकर यांनी दरेकर यांना चोख प्रत्युत्तर दिलं आहे.
त्या म्हणाल्या,’दरेकर भाजप पक्षाचे एवढे मोठे नेते आहेत, मात्र त्यांना महिलांचा अपमान करण्याचा अधिकार कोणी दिला? मी आज इथपर्यंत भांड्यांची काम करून पोचवले आहे. मी महाराष्ट्राची कला परदेशात नेली. लावणी करायला मी शिकवली, कष्टाने वर आलेल्या महिलांचादेखील दरेकर यांनी अपमान केला. त्यामुळे पुढच्या दोन दिवसात दरेकर यांनी माफी मागावी अन्यथा याचे परिणाम वाईट होतील’ असा इशारा सुरेखा पुणेकर यांनी दिलेला आहे.
तत्पूर्वी,प्रविण दरेकर यांच्या या वादग्रस्त विधानावर राष्ट्रवादीकडून तुफान टीका करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनीदेखील कठोर शब्दात प्रविण दरेकर यांच्यावर टीका केली.