पुणे – लग्नसराईचे दिवस सुरू झाले असून वैयक्तिक आणि सामूहिक विवाह सोहळ्यांचे आयोजन केले जाते. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेत, आयोजकांनी अशा सोहळ्यांचे आयोजन करू नये. तसेच अन्य विवाह सोहळेही शक्य झाल्यास पुढे ढकलावे, असे आवाहन विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
एकट्या पुणे शहरातच करोनाचे 10 रुग्ण आढळले आहेत. हा प्रादुर्भाव वेळीच रोखण्यासाठी ठोस पावले उचलली जात आहे. त्याचबरोबर नागरिकांनीही सहकार्य करून गर्दी होणार नाही, असे कार्यक्रम घेऊ नये. नियोजित कार्यक्रम रद्द करावे, किंवा पुढे ढकलावे, असे आवाहन विभागीय आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांच्याकडून वेळोवेळी केले जात आहे.