पाकिस्तानने एफ-16 वापरले नाही तर, मग एम-रॅम मिसाइलचे अवशेष भारतात कसे ? – निर्मला सीतारामन

नवी दिल्ली – अमेरिकेच्या एका मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानला जितकी एफ 16 विमाने दिली होती ती जशीच्या तशी शाबूत असल्याचे म्हंटले होते. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असल्याचे वृत्त अमेरिकन मासिकाने प्रसारीत केले होते. त्यानंतर आज संरक्षण मंत्री निर्मला सितारामन यांनी हा दावा फेटाळून लावला आहे.

अमेरिकन मासिकाने दिलेले हे वृत्त निराधार आणि स्त्रोत आधारित नसल्याचे निर्मला सितारामन यांनी म्हंटले आहे. भारतीय वायू सेनेकडे एफ -16 विमानाने भारतीय हद्दीत प्रवेश केल्याचे इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर पुरावे असल्याचेही सितारामन यांनी सांगितले. भारताकडे एम-रॅम मिसाइलचा अवशेष पुरावा असून, हा भाग फक्त एफ -16 विमानामध्येच वापरला जातो, मग तो भारतात कसा आढळला? असा प्रतिप्रश्न निर्मला सीतारामन यांनी केला आहे.

अमेरिकेच्या एका मासिकाने दिलेल्या वृत्तानुसार, पाकिस्तानला जितकी एफ-16 विमाने दिली होती ती जशीच्या तशी शाबूत असल्याचे म्हंटले होते. अमेरिकेच्या संरक्षण विभागातील दोन वरीष्ठ अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली असल्याचे वृत्त अमेरिकन मासिकाने प्रसारीत केले होते. त्यानंतर काल पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी याच वृत्ताचा आधार घेत भारतावर आरोप केले होते.

त्यानंतर निर्मला सीतारामन यांनी हे वृत्त खोटे असल्याचे सांगत, कोणीतरी मला सोशल मीडियावर दाखवले आहे की यूएस अधिकारी असेही म्हणत आहेत की त्यांनी अशी कोणतीही तपासणी केली नाही, असे त्या म्हणाल्या

 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.