शाळा महाविद्यालयात सीसीटीव्ही न लावल्यास गुन्हा

शाळा, महाविद्यालयांत सीसीटीव्ही आवश्‍यकच
न लावल्यास संबंधितांवर गुन्हा : पोलीस अधीक्षकांचा इशारा
– निर्भया, दामिनी पथकांची संख्या दुप्पट

पुणे- बारामती येथे रोडरोमिओंच्या त्रासाला कंटाळून आकांक्षा दरेकर या अकरावीत शिक्षण घेणाऱ्या मुलीने विष पिऊन आत्महत्या केल्याचा प्रकार घडला. ही बाब गांभीर्यान घेत पुणे ग्रामीण पोलिसांनी महिला सुरक्षेला प्राधान्य देण्याचे ठरविले आहे. यासाठी प्रथम निर्भया पथक आणि दामिनी पथकांची संख्या दुप्पट करण्यात येणार आहे. तर प्रत्येक गावात महिला सुरक्षा समिती तयार करण्यात येणार असून त्यांची सदस्य संख्या 100 पर्यंत वाढविण्यात आली आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

जिल्ह्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांत सीसीटीव्ही बंधनकारक करण्यात येणार असून पुढील तीन महिन्यांत जे शाळा, महाविद्यालय सीसीटीव्ही बसविणार नाहीत, त्यांच्यावर सीआरपीसी 144 (2) नुसार गुन्हा दाखल करण्याचा इशारा पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे. यावेळी अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पाखले, संदीप जाधव उपस्थित होते.

* पोलीस काका आणि काकीही
संदीप पाटील म्हणाले, पुणे जिल्हा परिषद तसेच जिल्हयातील नगरपालिका यांनी त्यांच्या क्षेत्रात प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही बसवावेत, यासाठी पत्रव्यवहार करण्यात येत आहे. तर गणेशोत्सवाच्या पार्श्‍वभूमीवर गणपती मंडळांनी डॉल्बीऐवजी सीसीटीव्ही बसवणे उपक्रम हाती घ्यावा, असेही आवाहन करण्यात येत आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या हद्दीतील प्रत्येक शाळेत विद्यार्थीनी सुरक्षा समिती तयार करण्यात येणार असून दरमहा त्याची बैठक आयोजित केली जाईल. प्रत्येक शाळेत असणारी तक्रारपेटी वेळोवेळी तपासून विद्यार्थीनींच्या तक्रारींवर प्राधान्यायने कारवाई केली जाणार आहे. प्रत्येक शाळेतील विद्यार्थीनीकडे एका पुरुष पोलीस कर्मचारी आणी महिला कर्मचारीयांचा मोबाईल नंबर असेल आणि कोणत्याही प्रसंगी ती विद्यार्थीनी संबंधित पोलीस काका, पोलीस काकी सोबत संपर्क करु शकेल.

* पुणे जिल्हयात 2,360 “हॉटस्पॉट’ *
अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पाखले म्हणाले, बारामती येथे आत्महत्या केलेल्या मुलीने पोलिसांकडे लेखी अथवा तोंडी तक्रार दिलेली नव्हती. त्यामुळे यापुढील काळात विद्यार्थींनींसोबत समन्वय साधला जाईल. निर्भया स्कॉडचे काम सुधारण्यासाठी 8 पथकांची 16 पथके करण्यात येत आहे. प्रत्येक पथकास तीन गोपनीय कॅमेरे देण्यात आले आहे. तर, 12 दामिनी पथकांची संख्या 24 करण्यात आली आहे. तसेच कारवाई करण्यात आलेल्या तरुणांना सुधारण्यासाठी समुपदेशन पथके तयार करण्यात आली आहे.

महिला सुरक्षा दृष्टीने पुणे ग्रामीण जिल्हयात 2,360 “हॉटस्पॉट’ निवडण्यात आले आहेत. चालू वर्षभरात एकूण चार हजार मुलांना मुलींच्या छेडछाड प्रकरणी समुपदेशन करण्यात आले असून यासंर्दभात 22 गुन्हे दाखल करण्यात आले आहे. महिला, मुलींच्या संर्दभातील केस न्यायालयात फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्यात याव्यात याकरिता न्यायालयाशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे. सध्या बारामतीत 125 ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्याचे काम सुरू आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)