Virat Kohli And Anushka Sharma | सध्या अंबानींच्या लग्नसोहळ्याची सर्वत्र चर्चा सुरू आहे. अनेक दिग्गज लोकांनी या सोहळयाला हजेरी लावली. बॉलीवूडचे सर्वच कलाकार मंडळी या विवाह सोहळ्याला उपस्थित असल्याचे पाहायला मिळाले. मात्र या लग्नात विराट कोहली आणि त्याची पत्नी अनुष्का शर्मा दिसले नाहीत. सध्या हे दोघेही लंडनमध्ये असून त्यांचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
टी-20 वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सध्या कोहली कुटुंब लंडनमध्येच आहेत. ते तिथेच शिफ्ट झाल्याचीही चर्चा आहे. काही दिवसांपूर्वी विराट आणि अनुष्काचा लंडनमध्ये एका कीर्तनात दंग झाल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. यानंतर अनुष्का शर्माने इंस्टाग्रामवर एक नवीन पोस्ट शेअर केली आहे. कृष्ण दास यांच्या कीर्तनाचे फोटो शेअर करत अनुष्काने त्यांना सोशल मीडियावर टॅगही केले आहे. Virat Kohli And Anushka Sharma |
कृष्ण दास कोण आहेत?
विराट आणि अनुष्का दोघेही नीम करोली बाबाचे भक्त आहेत. कृष्ण दास यांना ‘योगाचा रॉक स्टार’ म्हटले जाते. ते पारंपारिक भारतीय भजन आणि समकालीन संगीत यांचे मिश्रण करतात. त्यांचे खरे नाव जेफ्री कागेल आहे. त्यांनी 1960 च्या दशकात भारत प्रवास करून नीम करोली बाबा यांचे शिष्य बनून त्यांचा आध्यात्मिक प्रवास सुरू केला होता.
अनुष्काच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर, ती शेवटची शाहरुख खानसोबत ‘झिरो’ चित्रपटात शेवटची दिसली होती. यानंतर आता ती प्रोसित रॉयच्या ‘चकदा एक्सप्रेस’ या स्पोर्ट्स फिल्ममध्ये भारतीय क्रिकेटर झुलन गोस्वामींची भूमिका साकारणार आहे. Virat Kohli And Anushka Sharma |
हेही वाचा:
रोहित शर्माच्या बायोपिकमध्ये काम करण्याचा मराठमोळ्या अभिनेत्याला चाहत्याचा सल्ला