दीदींनी बंगालच्या मातीचा रसगुल्ला बनवून दिला तर ‘प्रसाद’ म्हणून स्वीकारेन – मोदी

पश्चिम बंगाल – पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यामधील शाब्दिक चकमक कमी होण्याची चिन्हं दिसत नाहीयेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकांच्या प्रचार सभांमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर वेळोवेळी सडकून टीका केली असून पंतप्रधानांच्या टीकेला मंतांकडून देखील त्यांच्याच भाषेत प्रतिउत्तरं देण्यात आली आहेत.

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार याला दिलेल्या एका अराजकीय मुलाखतीमध्ये पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी आपले सलोख्याचे संबंध असल्याचे म्हंटले होते. यावेळी बोलताना पंतप्रधानांनी ममता दीदी आपल्याला कुर्ते व मिठाई पाठवतात अशी माहिती देखील दिली होती. पंतप्रधानांच्या या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ममतांनी, “आम्ही आता मोदींना माती आणि दगडाचे खडे घालून बनवलेले रसगुल्ले पाठवू” असं वक्तव्य केलं होत.

याच पार्श्ववभूमीवर आता ममतांच्या वक्तव्याला पंतप्रधानांकडून प्रतिउत्तर देण्यात आले आहे. ते म्हणाले, “दीदी म्हणाल्या की त्या मला दगड मातीपासून बनवलेला रसगुल्ला देऊ इच्छितात. या पश्चिम बंगालची माती रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, जे.सी. बोस, नेताजी, एसपी मुखर्जी यांसारख्या थोर महापुरुषांच्या पदस्पर्शाने पावन झाली आहे. अशा या बंगालच्या पावन भूमीतील मातीचा रसगुल्ला ममता दीदींनी बनवून दिला तर मी तो प्रसाद म्हणून स्वीकारेन.”    .

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.