दहशतवादाच्या लढ्यात माध्यमांची भूमिका निर्णायक : अजित डोव्हाल

नवी दिल्ली : दहशतवादाच्या लढ्यात माध्यमांची भूमिका निर्णायक आहे. तपास यंत्रणा आणि माध्यमांत पारदर्शकता असली पाहिजे. माध्यमांना विश्‍वासात घेतले पाहिजे, अशी अपेक्षा राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोव्हाल यांनी व्यक्त केली.

देशातील तपास यंत्रणांच्या प्रमुखांच्या बैठकीत डोव्हाल बोलत होते. ते म्हणाले, तुम्ही (यंत्रणा) माहिती देत नाही तेव्हा ते अंदाज बंधतात. त्यातून अधिक भय निर्माण होते. त्यामुळे सांमजस्य अधिक महत्वाचे ठरते. मार्गारेट थॅचर म्हणत असत, दहशतवादी कृत्य घडली आणि माध्यमे शांत बसली तर दहशतवाद संपून जाईल.

दहशतवादी कृत्ये प्रसिध्दीच्या हव्यासापोटी केली जातात. जर एखाद्या दहशतवादी हल्ल्यात 10 जण ठार झाले आणि ते कोणालाच कळले नाही तर कोणीही घाबरणार नाही. जर एखाद्या मुलाचे अपहरण करून खून झाला असेल तर तेथून 500 मैलावर असणारी माताही माझ्या मुलीच्या बाबत असे काही होणार नाही, या विचाराने घाबरून जाईल. पण ही घटनाच तिला समजली नाही तर ती घाबरणार नाही.

दहशतवादाशी लढण्यात सर्वात मोठा अडथळा हा यंत्रणांमधील सामंजस्याचा आहे. केंद्रीय दहशतवाद विरोधी यंत्रणा, लष्के, गुप्तचर खअते, रॉ, आणि एनआयए एकत्रितपणे काम करत नाहीत. या सर्व यंत्रणा एकाच छत्राखाली असाव्यात असे माझे व्यक्तीगत मत आहे. पण ते शक्‍य नसल्याने परस्परांतील सामंजस्य वाढवणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.