Who Will Be New BCCI Secretary : जय शाह होणार ICC चे पुढील अध्यक्ष? जय शहा यांच्या नावावर एकमत होणार का? वास्तविक, असे मानले जाते की ऑस्ट्रेलिया क्रिकेट बोर्डाव्यतिरिक्त, इंग्लंड क्रिकेट बोर्डासह अनेक देशांचा जय शाह यांना पाठिंबा आहे. अशा परिस्थितीत जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.
मात्र, जय शाह यांना आयसीसीचे अध्यक्ष व्हायचे आहे, अशी कोणतीही अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण सट्ट्याचा बाजार चांगलाच तापला आहे. जय शाह आयसीसीचे अध्यक्ष होतील, अशी अटकळ बांधली जात आहे. समजा, जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाले तर बीसीसीआयच्या सचिवपदाची जबाबदारी कोणाकडे येणार? ते जाणून घेऊया….
‘या’ चेहऱ्यांना मिळू शकते सचिवपदाची जबाबदारी?
जय शाह आयसीसीचे अध्यक्ष झाल्यास राजीव शुक्ला यांना बीसीसीआय सचिवपदाची जबाबदारी मिळू शकते, असे मानले जात आहे. वास्तविक, सध्या राजीव शुक्ला बीसीसीआयचे उपाध्यक्ष आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राजीव शुक्ला यांचा दावा सर्वात मजबूत आहे. याशिवाय आशिष शेलार यांच्या नावाची चर्चा आहे. आशिष शेलार बीसीसीआयचे नवे सचिव होऊ शकतात. एमसीए प्रशासनात सध्या आशिष शेलार हे मोठे नाव आहे. मात्र, अखेर कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
अरुण धुमल यांना मिळणार बीसीसीआय सचिवपदाची जबाबदारी?
राजीव शुक्ला आणि आशिष शेलार यांच्याशिवाय अरुण धुमल यांचेही नाव शर्यतीत आहे. सध्या अरुण धुमल आयपीएलचे अध्यक्ष आहेत. तसंच अरुण धुमल यांना खूप अनुभव आहे. राजीव शुक्ला आणि आशिष शेलार हे अरुण धुमल यांच्या मार्गात येत असले तरी आयपीएलचे अध्यक्ष बीसीसीआयचे सचिव होण्याचे प्रबळ दावेदार आहेत यात शंका नाही. मात्र, बीसीसीआयच्या सचिवपदासाठी कोणाचे नाव निश्चित होते हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.