Actress Mrunal Thakur : अभिनेत्री मृणाल ठाकूर दिग्दर्शक डेव्हिड धवन यांच्या कॉमेडी विश्वाचा पहिल्यांदाच भाग बनणार आहे. त्यांचा आगामी “है जवानी तो इश्क होना है,” हा एक रोमँटिक-कॉमेडी एंटरटेनर चित्रपट असून, यात मृणाल ठाकूर पहिल्यांदाच अभिनेता वरुण धवनसोबत रोमाँन्स करताना दिसणार आहे. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून, या नव्या जोडीला एकत्रित पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत. खरंतर मृणाल ठाकूरने आतापर्यंत अनेक चित्रपटांत उल्लेखनीय काम करत महत्वाच्या भूमिका साकारलेल्या आहेत. मृणाल आतापर्यंत गंभीर, भावनिक आणि थ्रिलर चित्रपटांमध्ये दिसली आहे. मात्र, यावेळी ती एका विनोदी आणि मजेशीर कथेचा एक महत्वाचा भाग असणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर लॅान्च कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात अभिनेत्रीने कॅामेडी चित्रपटात काम करण्याबाबत एक वक्तव्य केले आहे. जर तिला कॉमेडी प्रकारात काम करायचे झाले, तर तिला फक्त डेव्हिड धवन यांच्याच चित्रपटात काम करायला आवडेल. मृणाल गंमतीने म्हणाली, “डेव्हिड सर, माझी इच्छा आहे की मी तुम्हाला माझ्या करिअरमध्ये खूप आधी भेटले असते. मग कदाचित मला तुमच्यासोबत आणखी चित्रपटांमध्ये काम करण्याची संधी मिळाली असती. मी विचार करत होते, ‘सर, कृपया मला किमान तीन चित्रपटांसाठी साइन करा.'” या चित्रपटात काम केल्यानंतर तिची कॉमिक टायमिंग सुधारली असल्याचे मृणालने सांगितले. हा अनुभव तिच्या करिअरसाठी खूप खास असल्याचे देखील ती म्हणाली. ‘या’ दिवशी होणार रिलीज ‘है जवानी तो इश्क होना है’ हा वरुण धवन, पूजा हेगडे, मृणाल ठाकूर आणि मनीष कौल यांचा पहिला एकत्रित चित्रपट आहे. हा चित्रपट एक मजेदार कौटुंबिक मनोरंजन करणारा चित्रपट आहे. डेव्हिड धवन यांनी याचे दिग्दर्शन केले असून, ५ जून रोजी चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हेही वाचा : US Iran Peace Deal: “होर्मुज पुन्हा खुले होणार!” ; ट्रम्पांच्या दाव्याने खळबळ, इराणने दिले थेट उत्तर