न्यूयॉर्क – सोशल मीडियात अग्रेसर असणारी ट्विटर कंपनी खरेदी केल्यापासून जगातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती एलॉन मस्क हे सर्वांच्या चर्चेचा विषय बनले आहेत. त्यांनी केलेल्या प्रत्येक विधानाची चर्चा जगभरात होताना दिसत आहे. मात्र नुकतेच त्यांनी केलेल्या एका ट्विट जोरदार चर्चा जगात होताना पाहायला मिळत आहे. या ट्विटमध्ये मस्क यांनी संशयास्पदरित्या मृत्यूबाबत ट्विट केलं आहे. या ट्विटवर युजर्सच्या संमिश्र आणि काळजीच्या प्रतिक्रिया उमटत असल्याचे दिसत आहे.
मस्क यांनी या चर्चित ट्विटमध्ये लिहीले आहे की,जर माझा संशयितरित्या मृत्यू झाला तर चांगले होईल. मस्क यांचे हे ट्विट अगदी काही वेळातच प्रचंड व्हायरल झाले आहे. नेटकरी मस्क यांच्या ट्विटवर वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. मस्क यांच्या ट्विटनंतर त्यांच्या जीवाला धोका तर नाही ना, अशा चर्चा आणि भीती व्यक्त करण्यात येत आहे. अनेक युजर्सने या ट्विटला रिट्विट करत वेगवेगळ्या कमेंट केल्या आहेत.
दरम्यान, भविष्यात ट्विटर वापरण्यासाठी वापरकर्त्यांना शुल्क द्यावे लागेल, असे मस्क यांनी अगोदरच जाहीर केले आहे. मस्क यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ट्विटर नेहमीच कॅज्युअल युजर्ससाठी विनामूल्य असेल. परंतु व्यावसायिक आणि सरकारी युजर्सना यासाठी थोडी किंमत मोजावी लागू शकते.