पाच रुग्ण सापडल्यास सगळं गावच बंद

जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

पुणे – शहरालगतच्या गावांबरोबरच आता ग्रामीण भागामध्येही करोना बाधितांची संख्या वाढत आहे. यावर नियंत्रण आणण्याकरिता एका गावात करोनाचे पाच रुग्ण आढळल्यास आता संपूर्ण गावच प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) म्हणून जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सांगितले.

शहरालगतच्या गावांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकसंख्या आहे. हवेली तालुक्‍यामध्ये करोना रुग्णांची संख्या 500 पेक्षा अधिक आहे. पुरंदर आणि मुळशी तालुक्‍याने 100 आकडा पार केला आहे. तर दौंड, खेड, मावळ या तालुक्‍यांमध्येही करोना रुग्णांची संख्या वाढत आहे.

यामुळे आता ग्रामपंचायतीने कडक भूमिका घेतली पाहिजे. यापूर्वी एखाद्या गावात करोनाचा रुग्ण आढळ्यास तो भाग अथवा गल्लीच प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले जात होते. आता, यामध्ये बदल करण्यात आला आहे. कुठल्याही गावामध्ये करोनाचे पाच रुग्ण आढळले तर संपूर्ण गावच प्रतिबंधित क्षेत्र करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.