चंपा म्हणणे थांबवले नाही तर…; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

मुंबई – पंढरपूर पोटनिवडणूकीवरून सध्या राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. अजित पवार यांनी एका सभेदरम्यान बोलताना पुन्हा एकदा ‘चंपा’ असा उल्लेख करत भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना डिवचले होते. यावर चंद्रकांत पाटील यांनी आक्षेप नोंदवला असून अजित पवारांना इशारा दिला आहे.

चंद्रकांत पाटील म्हणाले कि, अजित पवारांना मला एक इशारा द्यायचा आहे. त्यांच्या लोकांनी खूप दिवस मला चंपा म्हणणे थांबवले होते. कारण मी बोलायला लागलो तर महागात पडेन असे सांगितले होते. आता हे थांबले नाही तर त्यांचीसुद्धा जी शॉर्टफॉर्म आहेत. त्यांच्या मुलापासून सर्वांची शॉर्टफॉर्म मला करावी लागतील, असे त्यांनी म्हंटले आहे.

काय म्हणाले होते अजित पवार?

पंढरपूरमधील एका सभेत अजित पवार यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. अजित अनंतराव पवार म्हणजे अअप तसेच चंद्रकांत पाटील म्हणजे चंपा असा शॉटफॉर्म होतो, असा टोला त्यांनी लगावला होता.

दरम्यान, पंढरपूर-मंगळवेढ्याची निवडणूक भाजपा जिंकणार हे स्पष्ट आहे, असा विश्वास चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.