#Photos : सेलिब्रेटींचे सार्वजनिक ठिकाणी ‘सुईss सटक!’

चालता चालता घसरून पडणे, ही एक नैसर्गिक बाब आहे. आपण सगळेच कधी ना कधी धडपडतो, चक्क घसरून पडतो, काहींचा तर कपाळमोक्ष ही होतो. मात्र, एखादी प्रसिद्ध व्यक्ती जर सार्वजनिक ठिकाणी पडत असेल तर त्याची लागलीच बातमी होते. त्यांचा फोटो, व्हिडीओ व्हायरल होतो.

योगगुरू बाबा रामदेव योगा करताना हत्तीवरून खाली पडल्याचा एक व्हिडिओ नुकताच सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. क्लिपमध्ये बाबा रामदेव हत्तीवर बसून योग मुद्रा करत असल्याचे दिसत आहे. व्हिडिओमध्ये काही सेकंदांकरिता, हत्तीच्या हालचालीमुळे रामदेव बाबाचा तोल बिघडला आणि ते खाली पडतात. मात्र, लगेच हसत हसत ते निघून जातात.

याच पद्धतीने काजोलपासून सोनाक्षी सिन्हापर्यंतच्या अनेक अभिनेत्री सार्वजनिक ठिकाणी धडपडल्याचे किस्से आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.

सुष्मिता सेन

माजी मिस युनिव्हर्स, सुष्मिता सेन २०१२ मध्ये ज्वेलरीच्या फॅशन शो दरम्यान, तिचे ब्लॅक गाऊन तिच्या पायात अडकल्यामुळे ती पडणारच होती, मात्र तिने आपल्या आईला मदतीसाठी बोलावले. नंतर तिला मिठी मारली आणि अशा रीतीने पुढे चालत गेली की जणू काही झाले नाही.

सनी लियोनी

बॉलिवूड अभिनेत्री सनी लियोनी जिथे जिथे जाते तिथे आकर्षणाचे केंद्र बनते. ती आपल्या पतीसह एका ठिकाणी गेली होती. तेंव्हा पाय घसरून पडल्यानंतर शरमेने तिथून निघून गेली.

सोनाक्षी सिन्हा

बंगळुरूमधील फॅशन शो दरम्यान सोनाक्षी सिन्हा तिच्या लांबलचक गोल्डन शेमरिंग गाऊनमध्ये अडकली होती आणि जवळजवळ कोसळली होती. तथापि, सोनाक्षीने पुन्हा आत्मविश्वासाने उठून रॅम्प वॉक पूर्ण केले आणि सर्वांनी तिचे कौतुक केले.

काजोल

‘दिलवाले’ च्या प्रमोशनमध्ये, अभिनेत्री काजोल घसरली आणि मीडियाशी बोलताना जवळजवळ खाली पडली! चित्रपटाचा नायक वरुण धवनने तिला सावरून धरले, ज्यामुळे काजोलला जास्त दुखापत झाली नाही.

कंगना रनौत

‘फॅशन या चित्रपटात कंगना रनौतने रॅम्प वॉक केले होते पण खऱ्या आयुष्यात ती फॅशन शो मध्ये पडल्याचे दिसून आले. सर्वांसमोर पडल्यामुळे ती अस्वस्थ झाली. तिने आपले सामान पॅक केले आणि शो मधून काढता पाय घेतला.

पूनम ढिल्लन

ज्येष्ठ अभिनेत्री पूनम ढिल्लन एका फॅशन शो मध्ये सहभागी झाल्यावर स्टेजवर साडीत पाय अडकून पडणे तिच्यासाठी लाजिरवाणा क्षण होता. मात्र, ती उठली आणि हसतमुख चेहऱ्याने तिचे चालणे पूर्ण केले.

श्रीदेवी

२०१० मध्ये नीता लुल्लाच्या फॅशन शोच्या शोस्टॉपर म्हणून दिवंगत अभिनेत्री श्रीदेवीने रॅम्पवर जवळपास तीनवेळा धडपडली. तिने परिधान केलेला ड्रेस घोळदार असल्याने ड्रेस तिच्या पायाखाली गोळा होऊन तिला आरामात चालणे अशक्य होते. श्रीदेवीने तरीही न घाबरता आत्मविश्वासाने हा रॅम्प वॉक पूर्ण केला होता.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.