एखादा मोठा नेता देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो, तर यात… : संजय राऊत

मुंबई – केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार या दोन नेत्यांमध्ये भेट झाल्याने राजकीय वातावरण ढवळून निघाले आहेत. यावरून राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे. आता शहा-पवार भेटीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

संजय राऊत म्हणाले कि, एखादा मोठा नेता देशाच्या गृहमंत्र्यांना भेटतो, यात चुकीचे काय आहे. गृहमंत्र्यांना आम्ही देखील भेटू शकतो. कामानिमित्त भेट झाली असेल तर यात चुकीचे काहीच नाही.

तसेच, राजकारणात कोणतीही बैठक गुप्त नसते. अनेक गोष्टी सार्वजनिक केल्या जात नाहीत. पण त्या नंतर सार्वजनिक होतात, जसे की बंद खोलीतील चर्चा असो, असा टोलाही राऊतांनी अमित शहांना लगावला आहे.

दरम्यान, शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल हे अहमदाबादमधून थेट मुंबईला आले. ते कोणालाही भेटले नाहीत. मात्र, आता एका गुजराती दैनिकात त्यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी आली आहे. हे भाजपचे षडयंत्र आहे. शरद पवार यांनी अमित शाह यांची भेट घेतल्याची बातमी निव्वळ अफवा आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.