जर 35 ए तात्पुरते असेल तर काश्‍मीरचे विलीनीकरणही तात्पुरते – फारुख अब्दुल्ला

श्रीनगर – जर जम्मू काश्‍मीरला विशेष दर्जा देणारे राज्य घटनेतील कलम 370 आणि 35 ए हे तात्पुरते असेल तर जम्मू काश्‍मीरचे भारतातील विलीनीकरणही तात्पुरतेच असले पाहिजे, असे नॅशनल कॉन्फरन्सचे अध्यक्ष फारुख अब्दुल्ला यांनी म्हटले आहे. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून ही कलमे रद्द करण्याची वारंवार धमकी दिली जात आहे. त्याला जम्मू काश्‍मीरमधील जनत वैतागली आहे, असेही अब्दुल्ला म्हणाले.

जम्मू काश्‍मीरच्या भारतातील विलीनीकरणासाठी घातलेल्य अटी पुन्हा लागू व्हाव्यात, असे पक्षचे उपाध्यक्ष ओमर अब्दुल्ला यांनी सोमवारी म्हटले होते. जम्मू काश्‍मीरसाठी “सद्र ए रियासत’ आणि स्वतंत्र पंतप्रधान असावेत, अशी ही अट आहे. त्याचेही फारुख अब्दुल्ला यांनी समर्थन केले. महाराजा हरीसिंहांनी विलीनीकरणाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्यानंतर दिल्ली कराराद्वारे जम्मू काश्‍मीरला घटनात्मक विशेष दर्जा नॅशनल कॉन्फरन्सनेच मागितला होता, याची आठवणही अब्दुल्ला यांनी करून दिली.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here