अवैध वाळू वाहतूक करणारा ट्रॅक्‍टर पकडला

संग्रहित छायाचित्र

संगमनेर – संगमनेर तालुक्‍यातील मांडवे शिवारातील मुळा नदी पात्रातून अवैध वाळू चोरी सुरु असल्याची माहिती गुप्त खबऱ्यांमार्फत समजल्याने उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या आदेशाने, त्यांच्या कार्यालयातील पोलिसांनी कारवाई करुन, एक ब्रास वाळूसह ट्रॅक्‍टर ताब्यात घेतला.

याबाबत पोलीस कॉंस्टेबल शांताराम मालुंजकर यांनी घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, मांडवे गावाच्या हद्दीतील मुळा नदीपात्रातून अवैध गौणखनिज चोरी सुरु असल्याची माहिती समजल्याने, उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या आदेशाने व घारगाव पोलिसांच्या मदतीने त्यांच्या कार्यालयातील शांताराम मालुंजकर, पोलिस कॉंस्टेबल बापूसाहेब हांडे यांनी कारवाई केली. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास मांडवे ते शिंदोडी रस्त्यावरील खामकर वस्तीजवळ अवैध वाळू वाहतुक करणारा ट्रॅक्‍टर त्यांनी पकडला, दरम्यान चालक गोरक्ष राजेंद्र बर्डे (रा.शिंदोडी) ट्रॅक्‍टर सोडून पळून गेला. पोलिसांनी ट्रॅक्‍टरसह तीन लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)