रायगड येथे एसटीत आयईडी आढळल्याने खळबळ

बॉम्ब निकामी करण्यात यश

रायगड – रायगड येथील एका वस्तीच्या एसटीमध्ये सापडलेली बॉम्बसदृश वस्तू निकामी करण्यात अखेर यश मिळाले आहे. पेणहून आपटा गावी जाणाऱ्या वस्तीच्या गाडीत ही वस्तू सापडली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पेण आगाराची बस आपटा गावी वस्तीसाठी जाते. बुधवारी रात्री नेहमीप्रमाणे ही बस पेणहून आपटा गावी जाण्यासाठी निघाली. रसायनी गावात पोहोचल्यानंतर रात्री 11 च्या सुमारास गाडीत एका सीट खाली अज्ञात वस्तू पडून असल्याचे चालक-वाहकाच्या निर्दशनास आले. यानंतर त्यांनी तातडीने पोलिसांना याची माहिती दिली. यानंतर अलिबाग येथून बॉम्ब स्कॉड घटनास्थळी रवाना झाले आणि त्यांना सुमारे 4 ते 5 तासांनी पहाटे चारच्या सुमारास बॉम्ब निकामी करण्यात यश आले.

रायगडचे पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी तातडीने घटनास्थळाची पाहणी केली आहे. दरम्यान रात्रभर ही एसटी बस पोलीस संरक्षणात ठेवण्यात आली होती. तसेच आपटा गावाला छावणीचे स्वरूप आले होते.
तीन किलो युरिया, सर्किट, डेटोनेटर आणि बॅटरीने आयईडी बनवण्यात आले होते. हा बॉम्ब एसटीमध्ये घेऊन येणारा व्यक्ती कोण हे अद्याप समजू शकलेले नाही. याबात पोलीस पुढील तपास करत असून कंडक्‍टर आणि चालकाचा जबाब नोंदवून घेतला आहे.

दरम्यान, पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्याचवेळी एक वस्ती एसटीमध्ये बॉम्ब सापडल्याने खळबळ उडाली आहे. शिवाय बॉम्ब ठेवणाऱ्या व्यक्तीचाही शोध सुरु आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)