झारखंडमध्ये जवानांवर आयईडी बॉम्बहल्ला; 11 जखमी

नवी दिल्ली – झारखंडमध्ये कोब्रा जवान आणि झारखंड पोलिसांच्या तुकडीवर आयईडी बॉम्ब हल्ला करण्यात आला. यामध्ये कोब्रा बटालियनचे 8 तर पोलिसांचे 3 जवान जखमी झाले आहेत.

झारखंडच्या कुचाई भागात पहाटे 4.53 च्या सुमारास एसआरपीएफच्या 209 कोब्रा बटालियनचे जवान आणि झारखंड पोलिसांचे संयुक्त पथक एका विशेष मोहिमेवर जात असताना त्यांच्यावर आयईडी हल्ला करण्यात आला. यामध्ये कोब्रा बटालियनचे 8 जवान आणि पोलिसांचे 3 जवान जखमी झाले आहेत. या जखमींना तात्काळ रांचीमधील हॉस्पिटलमध्ये हेलिकॉप्टरद्वारे नेण्यात आले आहे. दरम्यान, हा हल्ला कोणी केला हे अद्याप स्पष्ट नसून नक्षलवाद्यांनी केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.