पुलवामात पुन्हा आयईडी स्फोट, दोन जवान शहीद

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमध्ये पुन्हा एकदा स्फोट घडवून आणण्यात आला आहे. पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आयईडी स्फोटात दोन जवान शहीद झाले असून दोन स्थानिक नागरिक गंभीर जखमी आहेत.

सुरक्षा जवानांच्या पेट्रोलिंग करणाऱ्या ४४ आरआर या मोबाईल व्हॅनवर हा हल्ला करण्यात आला होता. दरम्यान, काश्मीरमधील अनंतनाग आणि पुलवामा येथे दहशतवाद्यांकडून गेल्या २४ तासांपासून हल्ले सुरूच आहेत. या हल्ल्यात २ जवान शहीद झाले असून ९ जवान जखमी आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.