अक्षय्यतृतीया ही गृहखरेदीची आदर्श वेळ

पुणे: वैशाख शुद्ध तृतीयेला येणारी अक्षय्यतृतीया म्हणजे साडेतीन मुहुर्तांपैकी एक. या दिवशी जे काही कराल त्याचा क्षय होत नाही, ही हिंदू धर्मीयांची यामागील धारणा. म्हणूनच लोक या शुभमुहुर्तावर सोने खरेदीला किंवा गुंतवणुकीला पसंती देतात. मात्र गेल्या काही वर्षांत या शुभमुहुर्तावर बाजारात गृहखरेदीची देखील मागणी वाढत असल्याचे लक्षात आले आहे.

यावर्षी सरकारने गृहखरेदीदारांसाठी अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. 1 एप्रिलपासून बांधकामांतर्गत असणाऱ्या घरांसाठी नवीन जीएसटी कर लागू झाला आहे. ज्याचा गृहखरेदीदारांना फायदा होणार आहे. रिझर्व्ह बॅंकेच्या रेपो दरांमध्ये कपात झाल्यानंतर बॅंकांनी व्याजदर कमी केला आहे. या सर्व घटकांचा एकत्रितपणे विचार करता यंदाची अक्षय्यतृतीय ही रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक करण्याची एक आदर्श वेळ ठरेल.

व्हॅस्कॉन इंजिनियर्स ग्राहकांना अद्वितीय अनुभव देण्यासाठी आघाडीवर असतात. यंदाच्या वर्षी या सणाच्या निमित्ताने आम्ही आमच्या गुडलाई (तळेगाव) येथील प्रकल्पासाठी 24 महिन्यांची भाडे हमी योजना घेऊन आलो आहोत, असे व्हॅस्कॉन इंजिनियर्सचे व्यवस्थापकीय संचालक सिद्धार्थ वासुदेवन यांनी सांगितले. या योजनेनुसार आमच्या सर्व ग्राहकांना 24 महिन्यांचे रु.8000/- पर्यंत दरमहा भाडे तर मिळेलच याशिवाय घर ताब्यात घेतल्याशिवाय कर्जाचा पूर्व-हप्ता (प्री-इएमआय) देखील चालू होणार नाही. त्याखेरीज, ग्राहक एक दुचाकी, एलईडी टीव्ही, फ्रिज, स्मार्ट फोन आणि बरेच काही जिंकू शकतात. आमच्या सायट्रॉन (वाघोली) या प्रकल्पासाठी आम्ही ग्राहकांना अपार्टमेंट बुक करताना 20 ग्रॅम सोने देऊ करत आहोत. या ऑफर्सद्वारे आम्ही आमच्या ग्राहकांना अक्षय्यतृतीयेच्या या मुहूर्तावर गृहखरेदीसाठी एक आदर्श पर्याय उपलब्ध करून देत आहोत.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.