नवी दिल्ली – आयसीएमआर संस्थेतर्फे कोविडची तीन राज्यांमध्ये आधुनिक चाचणी केंद्रे उभारण्यात येणार आहेत. महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल मध्ये ही केंद्रे उभारली जाणार असून उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी या तीन केंद्रांचे व्हिडीओ कॉन्फरन्सिग द्वारे उदघाटन करणार आहेत.
करोनावर नियंत्रण ठेवण्यासाठी चाचण्या वाढवण्याची गरज अनेक वेळा व्यक्त केली गेली आहे. तसेच या चाचण्या वेगवान पद्धतीने व्हाव्यात अशी अपेक्षाही वारंवार व्यक्त करण्यात आली आहे.
त्यानुसार आयसीएमआरने पुढाकार घेऊन ही केंद्रे सुरू केली असून महाराष्ट्र, उत्तरप्रदेश आणि पश्चिम बंगाल या तीन मोठ्या राज्यांमध्ये त्याची उभारणी केली जाणार आहे. या तीन राज्यांमध्ये करोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या केंद्रांची त्या राज्यांना गरजच होती.