नव्या करोना व्हायरसवर भारतीय लस प्रभावी आहे का?, ICMRचे संचालकांनी दिलं स्पष्टीकरण

तिरूअनंतपुरम – करोनाचे जे नवे अवतार समोर येत आहेत त्यावरही भारतीय लस कोव्हॅक्‍सिन प्रभावी ठरत असल्याचे संकेत चाचण्यांत मिळाले असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे भारताला व जगालाही दिलासा मिळणार आहे.

याबाबत माहिती भारतीय विज्ञान आणि संशोधन परिषदेने सांगितले की, ब्रिटन, ब्राझील आणि द. आफ्रिका या देशांत करोनाचे जे नवे स्वरूप आढळून आले आहे त्यावर भारतीय लस कोव्हॅक्‍सिन उपयुक्त ठरेल असे संकेत शेवटच्या क्‍लिनिकल ट्रायलमध्ये मिळाले आहेत.

केरळच्या आरोग्य विभागातर्फे एक वेबिनार आयोजित करण्यात आला होता. त्यात बोलताना आयसीएमआरचे संचालक डॉ. बलराम भार्गव म्हणाले की, कोव्हॅक्‍सिनची तिसरी क्‍लिनिकल चाचणी पूर्ण झाली आहे. त्यात सहभागी झालेल्या सर्व 25,800 स्वयंसेवकांना लस देण्यात आली आहे. आता आठवडाभरात अंतिम निष्कर्ष बाहेर येण्याची शक्‍यता आहे.

ते पुढे म्हणाले की, करोनाच्या संदर्भात भारताने पश्‍चिमेकडील देशांच्या तुलनेत अधिक सतर्कता बाळगत कठरो पावले उचलली. त्यामुळे भारताने घेतलेले निर्णय योग्यच ठरले. मात्र त्या देशांत जे काही झाले त्याला त्यांचे निर्णयच जबाबदार आहेत.

भारतात कोव्हॅक्‍सिन आणि कोविशिल्ड या दोन लसींना आपत्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. यातील कोव्हॅक्‍सिन ही लस भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांनी तयार केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.