पहिल्याच तिमाहीत आयसीआयसीआय बॅंकेला 120 कोटी रुपयांचा तोटा

नवी दिल्ली: वसूल न होणाऱ्या कर्जात वाढ झाल्यामुळे मोठी तरतूद करावी लागल्यामुळे आयसीआयसीआय बॅंकेला स्टॅंडअलोन पातळीवर दुसऱ्या तिमाहीत 119.5 कोटी रुपयांचा तोटा झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेला 2049 कोटी रुपयांचा नफा झाला होता.

आयसीआयसीआय बॅंक समूहाला दुसऱ्या तिमाहीत केवळ 4.93 कोटी रुपयाचा नफा झाला आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत या समूहाला 2604 कोटी रुपयाचा नफा झाला होता. बॅंकेच्या ढोबळ अनुत्पादक मालमत्तेत वाढ होऊन ती 8.81 टक्‍के झाली आहे. गेल्या वर्षी ही अनुत्पादक मालमत्ता 7.99 टक्‍के होती. त्यामुळे या तिमाहीत बॅंकेला 5871 कोटी रुपयांची तरतूद करावी लागली आहे. गेल्या वर्षी या तिमाहीत बॅंकेने 2608 कोटी रुपयांची तरतूद केली होती.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)