#ICCWorldCup2019 : अफगाणिस्तानविरुध्द न्यूझीलंडचे पारडे जड

स्थळ – टॉन्टन,
वेळ – सायं- 6 वाजता

टॉन्टन – विजयाची हॅट्ट्रिक साधण्याच्या प्रतिक्षेत असलेल्या न्यूझीलंडची आज येथे अफगाणिस्तानबरोबर लढत होणार असून या लढतीत त्यांचे पारडे जड मानले जात आहे.

न्यूझीलंड संघाने 2015 च्या विश्‍वचषक स्पर्धेत उपविजेतेपद मिळविले होते. यंदा त्यांनी आतापर्यंत पहिले दोन सामने जिंकताना सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. मात्र बांगलादेशविरुध्दच्या लढतीत विजय मिळविण्यासाठी त्यांना थोडासा संघर्ष करावा लागला होता. त्यांच्या या विजयात रॉस टेलर याने महत्वाचा वाटा उचलला होता. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये त्यांच्या वेगवान गोलंदाजांनी समाधानकारक कामगिरी केली आहे. मॅट हेन्‍री याने या दोन सामन्यांमध्ये मिळून सात गडी बाद केले आहेत. आजच्या लढतीमध्येही त्याच्यावर न्यूझीलंडची भिस्त आहे. त्याला ट्रेंट्‌ बोल्ट व लॉकी फर्ग्युसन यांनी चांगली साथ दिली आहे.

टेलर याने सांगितले, अफगाणिस्तानविरुध्द विजय मिळविण्याबाबत आम्हाला अडचण येणार नाही. तरीही आम्ही फाजील आत्मविश्‍वास बाळगणार नाही. त्यांची मुख्य मदार फिरकी गोलंदाजांवर आहे. साहजिकच आम्हाला फिरकी गोलंदाजीबाबत थोडीशी सावधानता बाळगावी लागणार आहे. आम्हाला विजयी वाटचाल कायम ठेवायची आहे. हेन्‍री हे आमचे प्रमुख अस्त्र असले तरीही मला फर्ग्युसन याच्याकडून आज मोठ्या अपेक्षा आहेत. तो अतिशय गुणवान गोलंदाज आहे.

मॅट्‌ याने सांगितले, अफगाणिस्तान संघास कमी लेखून चालणार नाही. सामन्यात कोणत्याही क्षणी कलाट्‌णी देण्याची त्यांच्याकडे क्षमता आहे. किंबहुना अतिशय धोकादायक म्हणूनच त्यांची ख्याती आहे. अफगाणिस्तानची मुख्य भिस्त फिरकी गोलंदाज रशीद खान व मोहम्मद नबी यांच्यावर आहे. श्रीलंकेविरुध्दच्या सामन्यात या दोन्ही गोलंदाजांनी चांगली लढत दिली होती.

अफगाणिस्तानचा कर्णधार गुलाबदीन नबी म्हणाला, आम्हाला फलंदाजीमध्ये सुधारणा करण्याची आवश्‍यकता आहे. किमान तीन चांगल्या भागीदारी होतील यावर अधिक लक्ष देण्यासाठी आमचा प्रयत्न राहीन्‌. संघातील वरीष्ठ फलंदाजांनी अधिकाधिक धावा कशा मिळतील याकडे लक्ष दिले पाहिजे. पहिल्या दोन्ही सामन्यांमध्ये फलंदाजांच्या खराब कामगिरीचा आम्हाला फटका बसला आहे. काही फलंदाजांकडून अपेक्षेइतकी जबाबदारीचा खेळ झालेला नाही.

प्रतिस्पर्धी संघ –

अफगाणिस्तान : गुलाबदीन नईब (कर्णधार), आफ्ताब आलम, अझगर अफगाण, दौलत झारदान, हमीद हसन, हशमतुल्ला शाहिदी, हझरतुल्ला झईझई, मोहम्मद नबी, मोहम्मद शहझाद (यष्टीरक्षक), मुजीब उर रहमान, नजीबुल्ला झाद्रान, नूर अली झाद्रान, रहमत शाह, रशीद खान, समीउल्ला शिनवारी.

न्यूझीलंड : केन विल्यमसन (कर्णधार), रॉस टेलर, टॉम लॅथम, कॉलिन डी ग्रॅंडहोम, टॉम ब्लंडेल (यष्टीरक्षक), ट्रेंट बोल्ट, लॉकी फर्ग्युसन, मार्टिन गप्तील, मॅट हेन्री, कॉलिन मुन्रो, जेम्स नीशाम, हेन्री निकोल्स, मिचेल सॅंटनर, इश सोधी, टीम साऊदी.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)