#ICCWorldCup2019 : कर्जबुडव्या मल्ल्याची ‘भारत-ऑस्ट्रेलिया’ सामना पाहण्यासाठी हजेरी, म्हणाला…

लंडन : भारतीय बँकांना नऊ हजार कोटींचा चुना लावणारा विजय मल्ल्या लंडनच्या ओव्हल मैदानावर आला आहे. लंडनमधील ओव्हलच्या मैदानावर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात रंगणाऱ्या सामन्यादरम्यान माल्याने हजेरी लावली आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने विजय मल्ल्याचा एक व्हिडिओ आणि फोटो प्रसारित केले आहेत.

विजय मल्ल्या स्टेडियममध्ये प्रवेश करतेवेळी प्रसारमाध्यमांनी त्याची प्रतिक्रिया जाणून घेण्याचा प्रयत्न केला. तेव्हा मी इथे सामना पाहण्यासाठी आलो असल्याचे सांगत त्याने अधिक काही बोलण्यास नकार दिला.

विजय मल्ल्यावर भारतीय बँकाचे 9 हजार कोटी रूपये बुडवल्याचा आणि मनी लाँन्ड्रीगचा आरोप आहे. सध्या भारत आणि ब्रिटन सरकारमध्ये विजय मल्ल्याच्या प्रत्यार्पणावरुन वाटाघाटी सुरु आहेत.

दरम्यान, विजय मल्ल्या यांच क्रिकेटप्रेम याआधीही पाहिलं गेलं आहे. सप्टेबंर 2018 मध्ये सुध्दा भारत-इंग्लंड कसोटी सामना पाहण्यासाठी मल्ल्याने हजेरी लावली होती. तसेच याआधी 2016 मध्ये ओव्हलच्या मैदानात चॅम्पियन ट्राफीमधील भारत-आफ्रिका सामना पाहण्यासाठी आला होता. त्यावेळी मैदानात भारतीय प्रेक्षकांनी चोर चोर अशी घोषणाबाजी केली होती.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.