#IccTestRanking : क्रमवारीत भारत अव्वलस्थानी तर पाकची घसरण

दुबई : आयसीसी कसोटी क्रमवारीत पाकिस्तान संघाची घसरण होऊन पाक संघ आठव्या स्थानी पोहचला आहे तर भारताचे अव्वल स्थान कायम आहे. ऑस्ट्रेलियाविरूध्द २-० ने झालेल्या पराभवाचा पाकला क्रमवारीत फटका बसला आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलिया संघ १०२ गुणांसह पाचव्या स्थानी पोहचला आहे. ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांचे गुण समान आहेत.

क्रमवारीत भारत १२० गुणांसह अव्वलस्थानी आहे. न्यूझीलंड ( १०९) दुस-या स्थानी, इंग्लंड ( १०४) तिस-या स्थानी आहे. वेस्टइंडिज ८५ गुणांसह सातव्या तर बांगलादेश ६० गुणांसह नवव्या स्थानी आहे. नुकत्याच झालेल्या कसोटी मालिकेत भारताविरूध्द बांगलादेशला २-० ने पराभव स्विकारावा लागला होता. क्रमवारीत ४९ गुणासह अफगाणिस्तान दहाव्या स्थानी आहे.

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिकेत पाकच्या नावे एकही गुण नाही. ११ डिसेंबरपासून श्रीलंकेविरूध्द होणा-या दोन कसोटी सामन्याच्या मालिकेत गुण प्राप्त करण्याची संधी पाक संघाला असणार आहे. भारतीय संघ ३६० गुणांसह अव्वल आहे. वेस्टइंडिज, पाकिस्तान, बांगलादेश आणि आफ्रिकेच्या नावे एकही गुण नाही.

आयसीसी जागतिक कसोटी अजिंक्यपद गुणतालिका

१) भारत (३६० गुण)
२) ऑस्ट्रेलिया (१७६ गुण)
३) न्यूझीलंड (६० गुण)
४) श्रीलंका (६० गुण)
५) इंग्लंड (५६ गुण)

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)