#IccT20Ranking : भारतीय महिला खेळाडू जेमिमा, राधाची क्रमवारीत झेप

दुबई : भारतीय महिला संघाने वेस्ट इंडिजविरूध्दच्या टी-२० क्रिकेट मालिकेत ५-० असे निर्भेळ यश मिळवले. या मालिकेत भारतीय संघाच्या फलंदाजा सोबत गोलंदाजांनी देखील चांगली कामगिरी केली. या कामगिरीमुळे महिला खेळाडूंच्या आयसीसीच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.

भारताच्या जेमिमा राॅड्रिग्ज आणि राधा यादव या महिला क्रिकेटपटूंनी आयसीसीच्या महिला टी-२० क्रिकेट क्रमवारीमध्ये झेप घेतली आहे. महिला टी-२० फलंदाजी क्रमवारीमध्ये जेमिमा ७१७ गुणांसह चौथ्या तर स्मृती मानधना ६६९ गुणांसह सातव्या स्थानी पोहचली आहे.

गोलंदाजी क्रमवारीमध्ये राधा ७६९ गुणांसह दुस-या स्थानावर पोहचली आहे. दीप्ती शर्मा ७२६ गुणांसह चौथ्या व पूनम यादव ७१६ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.