दुबई – आंतरराष्ट्रीय क्रिकेट समितीने (आयसीसी) झिम्बाब्वे क्रिकेट मंडळावर तत्काळ प्रभावाने बंदी घातली आहे. मंडळाच्या कामकाजात सरकारी हस्तक्षेप संपवण्याचा दिलेला शब्द पाळण्यात अपयश आल्याचे कारण देत झिम्बाब्वेवर बंदी घालण्यात आली आहे.
आयसीसीचे अध्यक्ष शशांक मनोहर यांनी याची घोषणा केली. झिम्बाब्वेने आयसीसीच्या संविधानाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांच्यावर बंदी घालण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. ते म्हणाले की, आमचा खेळ राजकीय हस्तक्षेपापासून दूर राहावा, अशी आमची इच्छा आहे. झिम्बाब्वेत जे झाले आहे ते आयसीसीच्या संविधानाचे गंभीर उल्लंघन आहे.