#ICCWorldCup2019 : पाकिस्तानचे इंग्लंडसमोर 349 धावांचे आव्हान

ट्रेंटब्रिज : सलामीवीर फलंदाज इमाम-उल-हक व फखर जमान यांनी केलेली चांगली सुरुवात आणि मधल्या फळीतील फलंदाज मोहम्मद हफीज, बाबर आजम आणि सरफराज अहमद यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर पाकिस्तान संघाने इंग्लंडसमोर 349 धावांचे आव्हान ठेवले आहे.

इंग्लंडचा कर्णधार इयोन मॉर्गन याने नाणेफेक जिंकून पाकिस्तान संघास प्रथम फलंदाजी करण्यास पाचारण केले होते. विश्वचषक स्पर्धेत पहिल्या सामन्यात लाजीरवाणा पराभव पत्करावा लागलेल्या पाकिस्तानने इंग्लंडविरुद्ध प्रथम फलंदाजी करताना 50 षटकांत 8 बाद 348 धावा केल्या आहेत.

पाकिस्तानकडून फलंदाजीमध्ये मोहम्मद हाफीज याने 62 चेंडूत सर्वाधिक 84 धावा केल्या. तर बाबर आजमने 63, सरफराज अहमदने 55, इमाम-उल-हकने 44 आणि फखर जमानने 36 धावा केल्या.

इंग्लंड संघाकडून गोलंदाजीत क्रिस वोक्स आणि मोईन अली यांनी प्रत्येकी 3 तर मार्क वुड यांने 1 गडी बाद केला. बेन स्टोक्स, आदिल राशिद जोफ्रा आर्चर यांना गडी बाद करण्यात अपयश आले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.