#ICCWorldCup2019 : विदेशी खेळाडूंची कामगिरी भारतासाठी चिंतेचा विषय

पुणे-  आयपीएल स्पर्धेत चमकदार कामगिरी केल्याने भारतीय संघातील खेळाडूंचा आत्मविश्‍वास जरी उंचावला असला तरी भारतीय खेळाडूं प्रमाणेच परदेशी खेळाडूंनी देखील आपल्या कामगिरीने प्रतिस्पर्धी संघांच्या उरात धडकी बसवली आहे. ज्यामुळे इतर संघांसोबतच भारतीय संघासाठी देखील हा चिंतेचा विषय असणार आहे.

यावेळी प्रमुख कामगिरी करणाऱ्या खेळाडूंमध्ये ऑस्ट्रेलियन खेळाडू डेव्हिड वॉर्नरने सर्व गोलंदाजांची जबरदस्त धुलाई करत केवळ 12 सामन्यांमध्ये 69.20 च्या सरासरीने 692 धावा जमवत ऑरेंज कॅप आपल्या नावे केली होती. तर, इंग्लंडच्या जॉनी बेअरस्ट्रोने चमकदार कामगिरीकरत 10 सामन्यात 56च्या सरासरीने 445 धावा जमवल्या आहेत.

त्यांच्या व्यतिरीक्‍त इतर संघांमधील ख्रिस गेल, आंद्रे रसेल, क्विंटन डी कॉक, स्टिव्ह स्मिथ यांनी चमकदार कामगिरी करत विश्‍वचषकासाठी तयार असल्याचे दाखवून दिले आहे. तर, गोलंदाजांमध्ये इम्रान ताहिर, कगिसो रबाडा, रसिद खान आणि जोफ्रा आर्चर यांनी देखील आपल्या गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघांना नमोहराम केलेले आहे.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.