ऑकलंड – मरिझान केपच्या अष्टपैलु खेळाच्या जोरावर दक्षिण आफ्रिकेने महिला विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत इंग्लंडचा 3 गडी राखून पराभव केला. प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडने टॅमी बेमॉंट व ऍमी जोन्सच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर 50 षटकांत 9 गडी गमावून 235 धावा उभारल्या.
दक्षिण आफ्रिकेच्या मरिझान केपने 5 गडी बाद केले. दक्षिण आफ्रिकेने हे आव्हान 49.2 षटकांत 7 गडी गमावून 236 धावा करत पूर्ण केले व स्पर्धेत आगेकूच केली.
त्यांच्या लॉरा व्होलहार्टने 77 धावांची खेळी केली. सुन लुसने 36 तर केपने फलंदाजीतही चमक दाखवताना 32 धावांची खेळी करत संघाचा विजय साकार केला. इंग्लंडकडून ऍना श्रुबसोलने 2 गडी बाद केले.