दुबई – आयसीसी टी-20 विश्वकरंडक स्पर्धा विजेत्यांसह विविध संघांच्या पारितोषिकांची रक्कम आयसीसीने जाहीर केल्यावर त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. विश्वकरंडक विजेत्या संघाला आयसीसी 12 कोटी रुपये बक्षीस म्हणून देणार असून ही रक्कम आयपीएल स्पर्धाविजेत्या संघापेक्षाही खूप कमी असल्याने सध्या आयसीसी टीकेची धनी होत आहे.
विश्वकरंडक टी-20 स्पर्धा येत्या 17 ऑक्टोबरपासून सुरु होत असून स्पर्धेतील विजेत्याला 12 तर, उपविजेत्या संघाला 6 कोटी देण्यात येणार आहेत. तसेच विविध फेरीत विजेत्या तसेच उपविजेत्या संघांनाही रोख बक्षिसे दिली जाणार आहेत. \
बीसीसीसआयची सर्वात मोठी स्पर्धा असा लौकिक असलेल्या आयपीएल स्पर्धा विजेत्या संघाला विश्व विजेते पदाबद्दल जास्त रक्कम मिळते. त्यामुळे आयसीसीने आयपीएलपेक्षा कमी रक्कम देत आपलेच हसू केले असल्याची टीका सध्या सुरु झाली आहे.
विश्वविजयाच्या रकमेपेक्षा जास्त रक्कम विराट कोहली, रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी, पॅट कमिन्स आणि ख्रिस मॉरिस या खेळाडूंना आयपीएलचा एक मोसम खेळून मिळते.