दुबई – आयसीसीने टी-20 विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेत सहभागी होण्याची परवानगी अफगाणिस्तानला दिली आहे. अफगाणीस्तानमध्ये तालिबानने सत्ता काबीज केल्यानंतर त्यांचा संघ आयसीसीच्या स्पर्धांमध्ये खेळणार का असा प्रश्न निर्माण झाला होता.
तालिबानने महिलांच्या क्रिकेट संघावर बंदी लावल्यामुळे त्यांच्या पुरूष संघावरही निर्बंध लावण्याबाबत आयसीसीने इशारा दिला होता. मात्र, विश्वकरंडक स्पर्धेत त्यांना परवानगी देण्यात आली आहे.
या स्पर्धेसाठी अफगाणिस्तानचा संघ पात्र ठरला होता. या स्पर्धेला येत्या 17 ऑक्टोबरपासून पात्रता सामन्यांने प्रारंभ होत आहे. मात्र, तालिबानच्या ध्वजाखाली जर अफगाणिस्तान संघ खेळणार असेल तर त्यांना मनाई केली जाईल, असेही आयसीसीने स्पष्ट केले आहे.
अफगाणिस्तान आयसीसीचा पूर्णवेळ सदस्य देश आहे. टी-20 विश्वकरंडक स्पर्धेत त्यांचा समावेश गट-2 मध्ये करण्यात आला आहे. याच गटात यजमान भारतीय संघासह पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांचाही समावेश आहे.