लोकेश राहुलची दुस-या स्थानी झेप
दुबई : न्यूझीलंडविरूध्दच्या टी-२० मालिकेत दोन अर्धशतकी खेळींसह २२४ धावा फटकावीत संघाला ५-० ने विजय मिळवून देण्यात महत्वाची कामगरी बजावणारा भारताचा सलामीवीर लोकेश राहुलने आयसीसी टी-२० क्रमवारीत दुस-या स्थानी झेप घेतली आहे. राहुलचे एकूण ८२३ गुण आहेत.
⬆️ KL Rahul
⬆️ Rohit SharmaThe India openers have made significant gains in the latest @MRFWorldwide ICC T20I Player Rankings for Batting 👏
Full rankings 👉 https://t.co/EdMBslOYFe pic.twitter.com/h5K1fgkyiD
— ICC (@ICC) February 3, 2020
पाकिस्तानचा बाबर आझम ८७९ गुणांसह क्रमवारीमध्ये अव्वल स्थानी कायम आहे तर आॅस्ट्रेलियाचा अॅरन फिंच ८१० गुणांसह तिस-या स्थानी आहे.
राहुल शिवाय भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली ६७३ गुणांसह नवव्या स्थानी आहे तर रोहित शर्माने दहावे स्थान मिळवले आहे. रोहितचे ६६२ गुण आहेत.
अन्य भारतीय फलंदाजांमध्ये श्रेयस अय्यरने ६३ व्या स्थानावरून ५५ व्या स्थानी तर मनीष पांडे याने १२ स्थानांच्या प्रगतीसह ५८ व्या स्थानी झेप घेतली आहे.