ICC Men’s Player of the Month nominees for November 2024 – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेतील दुसरा सामना ॲडलेडमध्ये उद्यापासून सुरू होणार आहे. या सामन्याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध पर्थ कसोटीमध्ये भारताला 295 धावांनी विजय मिळवून देणाऱ्या जसप्रीत बुमराहला आयसीसीच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्लेयर ऑफ द मंथ या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे.
बुमराहच्या बरोबरीने दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज मार्को जॅनसेन व पाकिस्तानच्या हारिस रौफ यांना देखील या पुरस्कारासाठी नामांकन देण्यात आले आहे. या शर्यतीमध्ये तीनही वेगवान गोलंदाज आहेत.
यापूर्वी बुमराहने या वर्षी जूनमध्ये हा पुरस्कार जिंकला होता. एका वर्षात दोन आयसीसी प्लेयर ऑफ द मंथ पुरस्कार घेण्याचा मान शुभमन गिलला मिळाला आहे. आता जसप्रीत बुमराहला पुरस्कार मिळाल्यास त्याच्या विक्रमाशी बरोबरी करेलं.
IND vs AUS : बुमराहला ॲडलेडमध्ये इतिहास रचण्याची संधी, झहीर आणि कुंबळेला ‘या’ बाबतीत टाकू शकतो मागे…
बुमराहानं नोव्हेंबरमध्ये ICC पुरुषांच्या कसोटी गोलंदाजी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवले होते आणि आता सर्वोत्तम खेळाडूचा पुरस्कार (Player of the Month) जिंकण्याचे त्याचे लक्ष्य असेल. रोहितच्या अनुपस्थितीत संघाची कमान सांभाळणाऱ्या बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात चमकदार कामगिरी केली. त्याने पहिल्या डावात 30 धावांत पाच आणि दुसऱ्या डावात 42 धावांत तीन बळी घेतले होते.