मँचेस्टर : वेस्ट इंडिजविरुद्धचा सामना भारताने एकतर्फी जिंकला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना भारताने 268 धावा केल्या. त्यानंतर वेस्ट इंडिजचा डाव 143 धावांत गुंडाळून 125 धावांनी विजय मिळवला.
दरम्यान, अफगाणिस्तानविरुद्ध धोनी याने संथ खेळ केला होता. त्यावेळी त्याच्यावर टीका झाली होती. वेस्ट इंडिजविरूध्द सामन्यात त्याच्याकडून त्याच खेळाची पुनरावृत्ती होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र त्याने 50 व्या षटकांत दोन षटकार व एक चौकार अशी फटकेबाजी करीत टीकाकारांना दमदार उत्तर दिले. त्याने 61 चेडूंमध्ये 3 चौकार व 2 षटकारांसह नाबाद 56 धावा केल्या. पांड्या याने 5 चौकारांसह 46 धावा केल्या.