दुबई – दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज जुबेर हमजा डोपिंगमध्ये दोषी आढळल्यामुळे आयसीसीने त्याच्यावर 9 महिन्यांची बंदी घातली आहे. आयसीसीच्या डोपिंग विरोधी समितीने हमजा अनेकदा डोपिंगच्या नियमांचा भंग केल्याप्रकरणी दोषी ठरवत ही कारवाई केली आहे.
यंदा 17 जानेवारी रोजी त्याची डोपिंग चाचणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला व त्यामुळेच आयसीसीने त्याला 9 महिन्यांसाठी निलंबित केले आहे. हमजावर 22 मार्च 2022 पासून बंदी घालण्यात आली असून 22 डिसेंबर 2022 रोजी बंदी संपेल. इतकेच नव्हे तर 17 जानेवारी ते 22 मार्च 2022 पर्यंतची त्यांची कामगिरी रद्द ठरवण्यात आली आहे.
हमजाने दक्षिण आफ्रिकेकडून आतापर्यंत 6 कसोटी आणि एक एकदिवसीय सामना खेळला आहे. त्याने बंदीसाठी निश्चित केलेल्या या कालावधीत केलेल्या 31 धावा (25 आणि 6) रद्द केल्या गेल्या आहेत. हमजा केवळ 26 वर्षांचा असून त्याने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 78 सामन्यांत 130 डावांत 5 हजार 271 धावा केल्या आहेत. त्यात 13 शतके व 26 अर्धशतके आहेत.