ICC Women’s T20 World Cup : पात्रता स्पर्धेत प्रथमच तब्बल 77 संघ

दुबई – क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी आयसीसी विविध प्रयत्न करत आहे. 9 ते 16 फेब्रुवारी 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेत होणाऱ्या महिला टी-20 विश्‍वचषकच्या पात्रता स्पर्धेत यंदा 77 संघ सहभागी होतील.

स्पर्धेत फ्रान्स, तुर्कस्तान, कॅमरून, भूतान, बोट्‌सवाना, मलावी, म्यानमार व फिलिपाइन्स यांचा प्रथमच समावेश करण्यात आला आहे. यंदा ऑस्ट्रेलियात झालेल्या महिला टी-20 च्या अंतिम सामना पाहण्यासाठी 86 हजार चाहत्यांनी मेलबर्नमध्ये हजेरी लावली होती.

नव्या आठ देशांसह अर्जेंटिना व ब्राझीलला 2012 नंतर प्रथमच पात्रतेमध्ये संधी मिळू शकते. यंदा 37 संघांदरम्यान एकूण 115 सामने खेळवले जातील. ऑगस्ट 2021 पासून पात्रतेचे सामने सुरू होतील आणि 2022 पर्यंत चालतील. यावेळी स्पर्धेत 10 संघ वाढवण्यात आले.

सात संघांना थेट प्रवेश…

यंदा थायलंड संघ टी-20 विश्‍वचषकात खेळल्यानंतर अनेक देश महिला क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी पुढे आले. पुरुष संघाच्या आधी महिला संघासोबत मुख्य करार करणारा ब्राझील हा पहिलाच देश बनला आहे. यजमान आणि क्रमवारीतील अव्वल 7 संघांना मुख्य स्पर्धेत थेट प्रवेश मिळेल.

अखेरच्या दोन जागेसाठी पात्रता स्पर्धेत घेतली जाईल. एकूण 10 संघांना संधी मिळेल. युरोप विभागातील पात्रता सामने 6 ऐवजी 15 व आफ्रिका विभागातील 17 ऐवजी 28 सामने होतील. अमेरिकन विभागातील सामन्यांची संख्या वाढवून 3 ऐवजी 12 केली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.