आयर्लंडच्या जोश लिटीलवर आयसीसीची कारवाई

मॅंचेस्टर – इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात जॉनी बेअरस्टो याच्याशी गैरवर्तन केल्याप्रकरणी आयर्लंडचा गोलंदाज जोश लिटील याच्यावर आयसीसीने कारवाई केली आहे.

या सामन्यातील 16 व्या षटकांत जोशच्या गोलंदाजीवर बेअरस्टोने फटकेबाजी केली. त्यावर जोशने बेअरस्टोला उद्देशून अपशब्द वापरले. त्यावर आयसीसीने जोशला आचारसंहिता भंगाबद्दल 1 डिमेरिट गुण देण्यात आले आहेत. जोशने आपली चूक मान्य केली असून पुन्हा गैरवर्तन घडल्यास आणखी कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयसीसीने दिला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.